
तीन वेळेस विक्रम विजेता
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स

स्वप्नांच्या , यशाच्या आणि उत्कृष्टतेच्या सततच्या प्रयत्नांच्या जगात आपले स्वागत आहे!
मी सूक्ष्म कलाकृतीकार सुरेश जगन्नाथ मंदरे (जन्म: २९ जानेवारी १९८२) — भारतीय सूक्ष्म कलाकृतीकार आणि तीन वेळस लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स विक्रम विजेता तसेच इतर अनेक सूक्ष्म कलाकृतीचे विक्रम केलेले आहेत. माझी कला आणि यश हे माझ्या वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्मकलेमुळे ओळखले जाते. माझ्या प्रवासामागे तीन शक्तिशाली तत्त्वे आहेत —स्वप्न पाहणे, विश्वास ठेवणे आणि कृती करणे. माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक स्वप्नामध्ये जीवन बदलण्याची ताकद असते —स्वप्न साकार करण्यासाठी दृढ निश्चय, स्वतःवर विश्वास, जिद्द आणि चिकाटीने पूर्णत्वाकडे वाटचाल केली, तर कोणतेही स्वप्न निश्चितच वास्तवात उतरू शकते.
महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील एका छोट्याशा गावात – मुंढे येथे वाढत असताना, माझं बालपण अतिशय साध्या पार्श्वभूमीवर गेलं. छोट्या गावामध्ये वाढलो परंतु, माझ्या मनात कायम एक तीव्र इच्छा होती—असं काहीतरी वेगळं करायचं, जेणेकरून माझ्या कुटुंबाचा, गावाचा आणि देशाचा गौरव होईल . अनेकजण आयुष्यभर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात—आणि मी सुद्धा असेच काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिलं, ते म्हणजे माझ्यातल्या सामान्यतेला आव्हान देण्याचं आणि आपले वेगळेपण साध्य करून दाखविण्याचे.
८ ऑगस्ट २००४ रोजी, टीव्हीवर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ कार्यक्रम पाहताना, मी स्वतःला अचानक प्रश्न विचारला. या प्रश्नाने माझं जीवनच बदलून टाकलं— मी सुद्धा असे काहीतरी वेगळे करू शकतो का ? मी एक हटके कलाकार होऊ शकतो का ? हाच क्षण माझ्यासाठी एक ज्वलंत प्रेरणादायी ठरला, ज्यातून सुरू झाला माझा स्वतःला सिद्ध करण्याचा आणि मोठं स्वप्न साकार करण्याचा प्रवास. आज मी अभिमानाने सांगतो—मी तीन वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव कमावलं असून, सूक्ष्मकलेत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
प्रत्येक यशामागे असते एक प्रेमाची, पाठिंब्याची ,त्यागाची आणि काहीतरी गमावल्याची कहाणी. माझ्या यशाचं खरं श्रेय माझ्या स्वर्गस्थ आई – सौ. कमल जगन्नाथ मंदरे यांना जातं, ज्यांनी मला मेहनतीचं मूल्य आणि मोठं स्वप्न पाहण्याचं धैर्य दिलं. वडील – श्री. जगन्नाथ अण्णा मंदरे यांनी मला खंबीर राहण्याचं बळ आणि आत्मविश्वास दिला. स्वर्गस्थ वहिनी – सौ. रुपाली संदीप मंदरे यांचा आधार आणि पुतण्या सिद्धार्थ याचा निरागस हर्ष माझ्या आठवणीत सदैव जिवंत आहे.
माझे वडीलबंधू – श्री. संदीप जगन्नाथ मंदरे हे माझं खंबीर पाठबळ ठरले आहेत. माझी मानस कन्या पुतणी – कु. सिद्धी संदीप मंदरे आणि भाची सोनाली पंजाबराव भंडारे यांच्याकडून मला सृजनशीलतेसाठी लागणारा संयम, एकाग्रता आणि निष्ठा शिकायला मिळाली. तसेच, माझे जिवलग मित्र श्री. दीपक जाधव आणि श्री. प्रल्हाद काटकर यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला.
आजही मी अजून मोठं काही ध्येय्य गाठण्यासाठी झटत आहे, पण माझा हेतू आता केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही. मी सूक्ष्मकलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यास, इतरांना वेगळं विचार करायला प्रेरित करण्यास आणि त्यांनाही काहीतरी विशेष करायला शिकवण्यास समर्पित आहे. माझी कहाणी ही या सत्याचा पुरावा आहे की, आवड, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर अगदी छोटंसं स्वप्नसुद्धा वास्तवात परावर्तित होऊ शकतं—स्वप्नांचे विश्व ते वास्तव. म्हणूनच सर्वांना मला एकाच सांगणे आहे प्रथम स्वप्ने पाहण्यास सुरुवात करा.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस – 2009 – एका तिळाचे 225 तुकडे करण्याचा विक्रम
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस – 2010 – एका तिळाचे 600 तुकडे करण्याचा विक्रम
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस – 2012 – एका तिळाचे 756 तुकडे करण्याचा विक्रम
रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक – 2013 – जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक
युनिक वर्ल्ड रेकॉर्डस – 2014 – एका तिळाचे 756 तुकडे करण्याचा विक्रम
वज्र वर्ल्ड रेकॉर्डस – 2017 – संपूर्ण “श्रीमद्भगवद्गीता” फक्त एका पानाव
(CAM) कॅसोरिया कंटेम्पररी आर्ट म्युझियम इटली येथे “तमसो मा ज्योतिर्गमय” या चित्राचा सहभाग – 2019
दूरदर्शन ‘डी डी सहाद्री’ या वाहिनीवर “अनोखी कलाकृती” हा स्पेशल कार्यक्रम – 2013
दूरदर्शन ‘डी डी सहाद्री’ या वाहिनीवर “विचारांच्या पलीकडले” या कार्यक्रमात प्रमुख सहभाग – 2021
जगातील सर्वात लहान हस्तलिखित कवितांची पुस्तके (पुस्तकाचा आकार फक्त ६ मिलीमीटर X ६ मिलीमीटर).
फक्त एकाच पानावर संपूर्ण “श्रीमद्भगवद्गीता” लिहिलेली.
“बायबल फक्त एकाच पानावर (नवा करार : संत मार्क यांनी लिहलेले प्रभू येशूचे कथानक )”
लहान आकारातील “पसायदान”
“श्री गुरूचरित्र कथा सार” माचिसच्या आकारातील पवित्र ग्रंथ.
“मेरा भारत महान”, “माझा भारत महान”, “India” हे शब्द आणि वाक्ये हजारो वेळा सूक्ष्म लेखन.
लहान आकारात “हनुमान चालिसा”
“भारतीय राष्ट्रीगीत” फक्त ११ मिलीमीटर मध्ये आणि इतर अनेक देशांची राष्ट्रगीते लहान आकारात.
लहान आकारातील “भारतीय संविधान”– (प्रस्तावना)
४४५०१ तिळातील “भारताचा नकाशा”
४०६६३ तिळातील “श्री गणेश” आणि बरेच काही…
दूरदर्शन डी डी सह्याद्री कडून विशेष दखल आणि विशेष कार्यक्रम “अनोखी कलाकृती” मध्ये सहभाग
दूरदर्शन डी डी सह्याद्री – कार्यक्रम “विचारांच्या पलीकडले” मध्ये सहभाग
स्टार माझा (आता ABP माझा) – विशेष बातमी प्रसारित
एस-न्यूज, कोल्हापूर – प्रादेशिक माध्यमांमध्ये कव्हरेज
इंडियन एक्सप्रेस (२०१३) – “In Fine Print: The Real Cool Dude” या शीर्षकाने लेख
पुण्यनगरी (२००९) – विशेष लेख
पुढारी (२००८) – विशेष लेख
तरुण भारत (२००७) – विशेष लेख
शिवसामर्थ (२००७) – विशेष लेख
लोकमत (२००८) – विशेष लेख
सकाळ (२०२४) – विशेष लेख
आणि बरेच काही…
“मला स्वप्नांच्या शक्तीवर विश्वास आहे.”
“प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वप्नांपासून होते. प्रगती किंवा यशाचं गुपित स्वप्नांच्या संकल्पनेत लपलेलं असतं.”— सुरेश जगन्नाथ मंदरे.
“सोनीसदीप आर्ट प्लॅनेट” या मंचाद्वारे “अनोख्या कलाकृती” कला प्रदर्शने अधिकाधिक ठिकाणी आयोजित करणे. हे एक असे आयोजन आहे जे अद्वितीय सूक्ष्मकला आणि हस्तलिखित कलाकृतींचे दर्शन घडवते. या प्रदर्शनाचा उद्देश तरुण प्रतिभांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या कोणत्याही क्षेत्रात नवकल्पना व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. सध्या मी या कार्यक्रमाचे आयोजन विविध शहरांमध्ये कॉर्पोरेट प्रायोजकांसह विस्तार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. या वाटचालीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या कॉलेज, सोसायटी, संस्थेत, कार्यक्रमात अशा अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करून सहभागी होऊ शकता अथवा प्रायोजक सहाय्य देऊ शकता जेणेकरून मी हा उपक्रम राबवू शकतो आणि नवीन पिढीस नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरणा देऊ शकेन.
तसेच निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी एक लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट मी ठेवले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपण प्रायोजक म्हणून सहाय्य करू शकता, जेणेकरून आपल्या सहकार्याने मी हा उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतो.
एक-एक वृक्ष लावून होतील लक्ष-लक्ष; सर्वत्र हिरवळ पाहून धरणीस होईल हर्ष.
तरी कृपया उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.
“प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा आत्मा असतो आणि प्रत्येक वेगळ्या आत्म्याला स्वप्नं असतात. जेव्हा एखादा व्यक्ती इतरांच्या कलाकृती पाहते ,तेव्हा त्याला वेगळ्या पद्धतीने स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळते.”


“जेव्हा तुम्हाला जीवनाच्या धावपळीपासून सुटका हवी असते, तेव्हा कलेशी नाते निर्माण करा . थोडा वेळ स्वतःसाठी घ्या आणि तुम्हाला अशी एक अद्भुत अनुभूती मिळेल, जी तुम्हाला ताजेतवाने आणि प्रेरित करेल.”
“मी माझ्या आनंदाच्या प्रति असलेल्या बांधिलकीचा अभिमान बाळगतो आणि माझ्या प्रत्येक कलाकृतीचा उद्देश जीवनातील ताणतणाव कमी करणे हा आहे.”
” कलाकृती घडविणे ही आत्म्याची खरी आवड आहे. कलाकृती पूर्णपणे स्वप्न आणि वास्तव यांच्या ताळतंत्राने घडवली जाते . कलाकार त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आपलं मन आणि आत्मा ओतून प्रत्येक रेषा, रंग, शब्द यामध्ये विचार, आवड, प्रेम आणि सौंदर्य व्यक्त करतात.”

